नवी दिल्ली - टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज मोहम्मद शमीने जीवनसाथी शोधण्यातही वेग दाखवला आहे. वर्षभरापूर्वी भारतीय संघात स्थान पटकावणा-या या वेगवान गोलंदाजाने त्याच्यापेक्षा गोलंदाजीत सिनीअर असलेल्या झहीर खान आणि इरफान पठाण यांच्या तुलनेत जीवनसंगिनी शोधण्यात चांगलाच वेग दाखवला.
झहीरने 2000 मध्ये अन् इरफानने 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, अजूनही दोघे सिंगल आहेत. त्यांच्या तुलनेत आर. पी. सिंग, आर. विनय कुमार, अशोक डिंडा, प्रवीण कुमार, जोगिंदर शर्मा आणि उमेश यादव या युवा गोलंदाजांनी विवाहाबाबत धडाडी दाखवली आहे.