आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्दीच्या जोरावर मोनिका करणार संधीचे सोने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत खेळण्याची मला संधी मिळाली आहे. या पहिल्या संधीचे सोने करण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करेन. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा निर्धार केला असल्याचे नाशिकची धावपटू मोनिका आथरेने सांगितले.
पुणे येथे 3 जुलैपासून तिसºया आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत नाशिकची मोनिका आथरे महिला गटातील 10 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
थर्ड एंट्रीमुळे भारतीय संघात संधी
चेन्नई येथे अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा पार पडली. या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, यजमान भारताला तिसरे स्थान पटकावणाºया खेळाडूंना संघात स्थान देण्याची सवलत मिळाली. याचा फायदा मोनिकाला झाला. तिने या स्पर्धेत 10 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत तिसरे स्थान पटकावले होते.
मदुराई येथे सुवर्णपदक
नाशिकच्या मोनिकाने पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. तिने 2008 मध्ये मदुराई येथील राष्ट्रीय स्पर्धेत ही उल्लेखनीय कामगिरी केली होती. तिने 3 किमीचे अंतर 10 मिनिटे 9 सेकंदांत पूर्ण करून शर्यत जिंकली होती. तिने 1500 मीटरच्या शर्यतीतही सुवर्णपदक जिंकले होते.
महिला गटात प्रिजाचे आव्हान
महिला खेळाडूंमध्ये मोनिकासमोर प्रिजा श्रीधरनचे तगडे आव्हान असेल. यासह तिला चीन व जपानच्या महिला धावपटूंसोबत स्पर्धा करावी लागेल.
सीनियर गटात खेळण्याची संधी
यूथ ज्युनियर चॅम्पियन मोनिका आथरेला प्रथमच सीनियर गटात खेळण्याची संधी मिळाली आहे. ज्युनियर गटात तिने वर्षभरात चमकदार कामगिरी केली. यासह तिने या गटातील राष्ट्रीय स्पर्धाही गाजवल्या आहेत.
पहिल्याच स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम
नाशिकच्या मोनिकाने पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या नावे नवा विक्रम नोंदवला होता. तिने 2008 मध्ये मदुराई येथील राष्ट्रीय स्पर्धेत ही उल्लेखनीय कामगिरी केली होती. तिने 3 किमीचे अंतर 10 मिनिटे 9 सेकंदांत पूर्ण करून शर्यत जिंकली होती.
34.40 मिनिटांचे टार्गेट
चेन्नई येथे सध्या भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाचे प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. मोनिका दररोज अडीच तास नियमितपणे सराव करत आहे. आशियाई स्पर्धेत 10 हजार मी. चे अंतर 34 मिनिटे 40 सेकंदांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करण्याचे मोनिकाचे टार्गेट आहे.

स्पर्धेतील सहभागी गट
महिला गटाच्या 10 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभाग