आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय खेळाडू घडवण्यावरच महिन्याचा पगार खर्च!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालोद - शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने जिद्दीने अनेकांना प्रेरणा मिळेल, अशी कामगिरी करून दाखवली. बालोदच्या कोहंगाटोला येथील शाळेवर 51 वर्षीय राधेलाल साहू हे शिक्षक आहेत. ते या ठिकाणी संस्कृतचा विषय शिकवतात. विद्यार्थ्यांना संस्कृतीचे धडे गिरवायला लावणा-या या शिक्षकाने आतापर्यंत अनेक राष्‍ट्रीय खेळाडू घडवण्याची अनोखी कामगिरी केली. यासाठी त्यांनी आपल्या स्वत:च्या पगारातील रक्कम खर्च करून खेळाडूंना मार्गदर्शन केले.
महिन्यांकाठी 35 हजारांचे वेतन असलेले राधेलाल हे दर दोन महिन्यांनी खेळाडंूसाठी 10 ते 12 हजार रुपये खर्च करतात. वेळप्रसंगी यापेक्षाही अधिक खर्च करण्याची त्यांची तयारी असते. याच मेहनतीचे फळ म्हणून आजच्या घडीला 30 पेक्षा अधिक राष्‍ट्रीय खेळाडू घडले आहेत. त्यांच्यामुळे अनेक खेळाडूंच्या जीवनाला आधार मिळाला.
1990 पासून अविरत कार्य
मागील 1990 पासून त्यांनी या सामाजिक कार्याला सुरुवात केली. या वेळी मिळालेल्या समाधानामुळे त्यांनी आपले पाऊल मागे घेतले नाही. जमेल तसे त्यांनी खेळाडूंना बूट, ट्रॅक सूट, प्रवास भाड्यासाठी पैसे दिले. यावरच ते थांबले नाही, तर त्यांनी स्वत: स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंसोबत हजेरी लावली. नुकत्याच रांची येथे झालेल्या शालेय राष्‍ट्रीय स्पर्धेतही ते आपल्या खेळाडूंसमवेत उपस्थित होते. कोणताही प्रतिभावंत खेळाडू गरिबीमुळे स्पर्धेला मुकणार नाही, याकडेच ते अधिक लक्ष देतात.
घरात होतात वाद
खेळाविषयी आवड असल्याने राधेलाल हे महिन्यांकाठी मोठा खर्च करतात. यावरून घरात अनेक वेळा वाद निर्माण झाले. दुस-यांच्या मदतीसाठी पैसे खर्च होत असल्याने घर चालवण्याचाही प्रश्न निर्माण होतो. याच वरून वादाचा सामना रंगतो. मागील 30 वर्षांच्या शिक्षकाच्या नोकरीत त्यांच्याकडे स्वत: च्या मालकीचे केवळ एक राहते घर आहे.
खेळाडू बनली पोलिस
दगड फोडून संसाराचा गाडा ओढणा-या शिवकुमार या मजुराची मुलगी पोलिस अधिकारी झाली आहे. ते याचे श्रेय शिक्षक राधेलाल यांना देतात. राष्‍ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांनी शिवकुमार यांच्या ऋतू नावाच्या मुलीला आर्थिक मदत केली. याच मदतीमुळे ऋतूने या स्पर्धेत दोन पदके पटकावली. तसेच आशिष वेल्लूरदेखील राधेलाल यांनी केलेल्या मदतीमुळे राष्‍ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ शकला.