आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माँट्रियल मास्टर्स चषक टेनिस : योकोविकची आगेकूच; अँडी मुरे पराभूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माँट्रियल - सर्बियाचा नोवाक योकोविकने माँट्रियल मास्टर्स चषक टेनिस स्पर्धेत आगेकूच केली. मात्र, विम्बल्डन चॅम्पियन अँडी मुरेला स्पर्धेतून पॅकअप करावे लागले. त्याला पुरुष एकेरीच्या तिसर्‍या फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत 38 व्या स्थानी असलेल्या अर्नेस्ट गुलबिसने मुरेवर सनसनाटी विजय मिळवला. त्याने 6-4, 3-6 अशा फरकाने सामना जिंकला. योकोविकने उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टोमिनला 2-6, 6-4, 6-4 अशा फरकाने पराभूत केले.

यंदाच्या सत्रातील शेवटच्या ग्रँडस्लॅम यूएस ओपनची तयारी करणार्‍या मुरेला या पराभवाने मोठा धक्का बसला. विम्बल्डननंतर दुसरा सामना खेळणार्‍या मुरेने अवघ्या 90 मिनिटांत गुलबिससमोर गुडघे टेकले. त्याने सुरेख खेळी करून सामना आपल्या नावे केला.

पेस-स्तेपानेकचा पराभव
चौथ्या मानांकित लिएंडर पेस व चेक गणराज्यचा रादेक स्तेपानेकचे रॉर्जस चषक टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या जोडीला पुरुष दुहेरीच्या दुसर्‍या फेरीत अँडी मुरे व कोलिन लेमिंगकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडच्या जोडीने 6-3, 6-3 अशा फरकाने सामना जिंकला.