Home | Sports | Other Sports | montreal-masters-open

मॉंट्रियल मास्‍टर्सः फेडररला धक्‍का, त्सोंगा,जोकोविचची आघाडी

वृत्तसंस्था | Update - Aug 13, 2011, 04:00 AM IST

वर्षाच्या सुरुवातीलाच एटीपी किताब पटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या फेडररचे स्वप्न भंगले

  • montreal-masters-open

    मॉट्रियल-पुरुष एकेरीच्या तिसर्‍या फेरीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत जो-विल्फेड त्सोंगा व अव्वल मानांकित विम्बल्डन विजेत्या नोवाक जोकोविचने एटीपी मॉट्रियल मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजयी आघाडी घेतली. आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर त्सोंगाने 7-6, 4-6, 6-1 गुणांची शानदार खेळी करून दुसर्‍या मानांकित रॉजर फेडररचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.
    विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या किताबाचा बहुमान पटकावल्यानंतर प्रथमच एटीपीच्या लढतीत उतरलेल्या जोकोविचने शानदार आघाडी घेतली. मॉरियनविरुद्धच्या लढतीत जोकोविचने पहिला सेट 7-5 गुणांनी सहज जिंकला. त्यानंतर दुसर्‍या सेटवरच्या लढतीत मॉरियनने आव्हान बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करत कोर्टवर काही काळ ताबा मिळवला होता. पुन्हा आक्रमक खेळीला उजाळा देत जोकोविचने 6-2 गुणांनी बाजी मारली.

    फेडररचे आव्हान संपुष्टात
    विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पराभवातून नुकत्याच सावरलेल्या स्वीस टेनिसपटू फेडररने एटीपी किताबाच्या लढतीत सहभाग नोंदवला होता. वर्षाच्या सुरुवातीलाच एटीपी किताब पटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या फेडररचे स्वप्न भंगले. फ्रेंच टेनिसपटू त्सोंगाने आक्रमक खेळी करून फेडररला दारुण पराभवाचा जबर धक्का दिला. पहिला सेट गमावल्यानंतर दुसर्‍या सेटवर 6-4 गुणांनी यशाला गवसणी घालणार्‍या फेडररला तिसर्‍या निर्णायक सेटची खेळी खडतर होती.

Trending