आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Montrial Masters Cup Tenis: Nadal Yokovic Play Final Match

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माँट्रियल मास्टर्स चषक टेनिस: नदाल-योकोविकमध्‍ये रंगणार उपान्त्य सामना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माँट्रियल - जगातील नंबर वन नोवाक योकोविक व स्पेनचा राफेल नदाल यांच्यात माँट्रियल मास्टर्स चषक टेनिस स्पर्धेची सेमीफायनल रंगणार आहे. हे दोन्ही दिग्गज टेनिसपटू 36 व्या वेळी समोरासमोर येत आहेत. अव्वल मानांकित योकोविकने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत सातव्या मानांकित रिचर्ड गास्केचा पराभव केला. त्याने सरळ दोन सेटमध्ये 6-1, 6-2 ने सामना जिंकला. दुसरीकडे राफेल नदालने ऑस्ट्रेलियाच्या मारिको मतोसेविकवर 6-2, 6-4 ने मात केली.


गुलबिसचा पराभव
शुक्रवारी अर्नेस्ट गुलबिसने लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन अँडी मुरेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. मात्र, उपांत्यपूर्व लढतीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला. कॅनडाच्या मिलोस राओनिकनेही उपांत्य फेरी गाठली. त्याने पुरुष एकेरीत गुलबिसला 7-6, 4-6, 6-4 ने पराभूत केले. दरम्यान गुलबिसने दुसरा सेट जिंकून लढतीत बरोबरी साधली होती. मात्र, तिस-या सेटमध्ये बाजी मारून मिलोसने सामना जिकंला.