आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Get Than Expected So I Am Happy : Abhishek Nair

अपेक्षेपेक्षा अधिक मिळाल्याने मी आनंदी :अभिषेक नायर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयपीएल टीम पुणे वॉरियर्सकडून 3.60 कोटींची किंमत मिळाल्याने सध्या अभिषेक नायर अधिक खुश आहे. आयपीएलच्या सहाव्या पर्वासाठी झालेल्या बोली प्रक्रियेत अभिषेक हा भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला‘देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. चांगली कामगिरी करण्यासाठी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले. अपेक्षेपेक्षा अधिक मिळाल्यामुळे मी फार आनंदी आहे,’ अशी प्रतिक्रिया अभिषेकने दिली.

अभिषेकने 2009 मध्ये आंतरराष्‍ट्रीय वनडे क्रिकेटला प्रारंभ केला. त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळला. तसे त्याला अद्यापपर्यंत राष्‍ट्रीय संघाकडून आंतरराष्‍ट्रीय टी-20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. 2005 मध्ये ऑ लराउंडर अभिषेकने मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. त्याने एकूण 57 प्रथम श्रेणी सामन्यात 57.61 च्या सरासरीने एकूण 3830 धावा काढल्या.