आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Morne Morkel Out Of Champions Trophy Because Of Injury

दुखापतीमुळे मोर्ने मॉर्केल चॅम्पियन्‍स ट्रॉफीतून बाहेर; ख्रिस मॉरिसचा संघात समावेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- दक्षिण आफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्केल दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्‍स ट्रॉफीतून बाहेर पडला आहे. त्‍याच्‍या जागी ख्रिस मॉरिसचा संघात समावेश करण्‍यात आला आहे.

आयसीसीच्‍या तांत्रिक समितीने मॉरिसच्‍या समावेशास मान्‍यता दिली आहे. शनिवारी तो संघात दाखल होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकन संघाला सलामीच्‍या सामन्‍यात टीम इंडियाकडून पराभूत व्‍हावे लागले होते. आयपीएलमध्‍ये खेळलेल्‍या मॉरिसला पहिल्‍यांदाच वनडे संघात स्‍थान मिळाले आहे. त्‍याने दक्षिण आफ्रिकेकडून दोन टी-20 सामने खेळले आहेत. मॉरिसने आयपीएलच्‍या सहाव्‍या सत्रात चेन्‍नई सुपरकिंग्‍जकडून खेळताना महत्‍वाची जबाबदारी पार पाडली होती. त्‍याने 15 विकेट घेतल्‍या होत्‍या. त्‍याशिवाय तो तळाला चांगली फलंदाजीही करू शकतो. मॉर्केलसारख्‍या दर्जेदार गोलंदाजाच्‍या दुखापतीमुळे दक्षिण अ‍ाफ्रिकेला जबरदस्‍त धक्‍का बसला आहे. डेल स्‍टेन, जॅक्‍स कॅलिस आणि ग्रॅमी स्मिथनंतर बाहेर होणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे.