आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mother Taken Money From Borrowed For Becoming Son Cricket Star

IPL: पैसे उधार घेऊन आईने कुमारला बनवले ‘स्टार’..!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- वडिलांची इच्छा होती की, मी क्रिकेटपटू व्हावे आणि कुटुंबाचे नाव मोठे करावे. मी चांगली कामगिरी करून टीव्हीवर झळकलो पाहिजे, असे आईलासुद्धा वाटायचे. मात्र, कुटुंबाची बिकट आर्थिक परिस्थिती याला अडचण ठरायची. यानंतरही मी हार मानली नाही. सलग मेहनत घेत होतो. स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच वडील आम्हाला सोडून गेले. मात्र, मी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतोय. राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू पालीचा कुमार बोरेसा बोलत होता. मागच्या वर्षी राजस्थान रॉयल्स आणि दैनिक भास्कर यांच्याकडून आयोजित टॅलेंट हंट स्पर्धेत कुमार बोरेसा चॅम्पियन ठरला होता. यामुळेच त्याला 10 लाख रुपयांत रॉयल्सने करारबद्ध केले.

अनेक वेळा सामने खेळण्यासाठी किंवा ट्रेनिंगला जाण्यासाठीसुद्धा पैसे नसायचे. मग आई पैसा उधार घेऊन मला स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठवायची. सुरुवातीपासून वडिलांना मला क्रिकेटपटूच बनवायचे होते. मी पालीतून 2009 मध्ये अंडर-16 मध्ये खेळलो होतो. मात्र, तेथे खास वातावरण, सुविधा नव्हत्या. जयपूरसारख्या शहरात येण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत माझे मित्र गौरव परमार, खुशाल परिहार, समाजसेवक जयसिंग राजपुरोहित आणि पालीचे जिल्हाधिकारी नीरज पवन यांनी आर्थिक मदत केली आणि मला धीर दिला.

यानंतर मी जयपूरला आलो आणि माजी रणजी कर्णधार मोहंमद अस्लम यांच्या अकादमीत ट्रेनिंगला सुरुवात केली. नोव्हेंबरमध्ये मी मुंबईत रॉयल्सचे कोच माँटी देसाई यांच्या अकादमीत ट्रेनिंग घेतली.

यादरम्यान जानेवारीत वडिलांचे निधन झाले. मी चांगलाच खचलो. मात्र, मित्रांनी धीर दिला, मला सांभाळले. आता वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यावर माझा जोर आहे, असे तो म्हणाला.