आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ही आहे विराटची मम्मी, भेटा भारतीय क्रिकेटर्सच्या आईंना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खेळ डेस्कः युवराज, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एंडी मरे यांच्या समवेत अनेक स्पोर्टस्टार असे आहेत, ज्यांच्या यशाच्या पाठीमागे त्यांच्या आईचे महत्त्वाचे स्थान आहे. युवराज सिंगला क्रिकेटची ट्रेनिंग त्याचे वडील योगीराज यांनी दिली, मात्र तो आईशी खुप भावनात्मकदृष्ट्या जुडलेला आहे. विराट कोहली क्रिकेट स्टार बनण्यापूर्वी त्याच्या वडीलांचा मृत्यू झाला होता. सचिन तेंडूलकर नेहमीच त्याच्या आईचे कौतुक करताना दिसतो. आज 10 मे, म्हणजेच जागतीक मातृत्व दिवस. यानिमित्ताने Divyamarathi.com खास तुमच्यासाठी घेऊन आला आहे भारतीय क्रिकेटर्स आणि त्यांच्या आईचे काही खास फोटो...
आईच्या हृदयाजवळ स्थान आहे या क्रिकेटर्सचे
भारतीय क्रिकेटर्सचे आणि त्यांच्या आईचे एकदम हळूवार नाते जुडलेले आहे. विराट, युवराज, सचिन तेंडुलकर नेहमीच त्यांच्या आईबद्दल बोलताना दिसतात. विराटने सोशल साईट्सवर त्याचा आणि त्याच्या आईचा किचन मधील एक फोटो पोस्ट केला आहे. विराटने एका मुलाखतीत स्वतःच्या यशाचे सर्व श्रेय त्याच्या आईला दिले आहे. त्याच प्रमाणे सचिन तेंडूलकरने त्याच्या ऑटोबायोग्राफीची सर्वात पहिली प्रत त्याची आई रजनीला भेट दिली होती.
पुढील स्लाईडवर पाहा, भारतीय क्रिकेटर्स आणि त्यांच्या आईचे काही निवडक फोटोज