आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mother\'s Day SPL: पाहा इंडियन क्रिकेटर्सच्या MOMsचे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई सरोज यांना किचनमध्या मदत करताना क्रिकेटपटू विराट कोहली - Divya Marathi
आई सरोज यांना किचनमध्या मदत करताना क्रिकेटपटू विराट कोहली
प्रत्येक यशस्वी पुरुषामध्ये एका स्त्रीचे योगदान असते, असे म्हटले जाते. मग ती आई, पत्नी, बहीणही असू शकते. क्रिकेटपटू युवराज, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एंडी मरेसह अनेक क्रिकेटर्स असे आहेत की, त्यांच्या यशस्वीतेमागे त्यांच्या आईचे मोठे योगदान आहे.
युवराज सिंहला क्रिकेटचे प्रशिक्षण त्यांचे वडील योगराज यांनी दिले असले तरी युवराजमध्ये त्याच्या आईने आत्मविश्वास निर्माण केला आहे. विराट कोहली क्रिकेटमध्ये स्टार बनण्यापूर्वीच त्याच्या वडिलांचा मृत्यु झाला. सचिन तेंडुलकरच्या आयुष्यात त्याच्या आईचे विशेष स्थान आहे. 10 मे रोजी 'मदर्स डे' झाला. त्यानिमित्त आम्ही आपल्यासाठी या पॅकेजमधून इंडियन्स क्रिकेटर्स आणि त्यांच्या आईविषयी माहिती देत आहोत.

विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी सोशल साइटवर एक फोटो शेअर केला होता. आई सरोजला तो किचनमध्ये मदत करताना दिसत आहे. आपल्या यशस्वीतेमागे आईचे मोठे योगदान असल्याचे विराटने एका इंटरव्ह्यूमध्येही म्हटले होते. सचिन तेंडुलकरने आपल्या ऑटोबायोग्राफीची पहिली प्रत आई रजनीला भेट दिली होती.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, निवडक इंडियन क्रिकेटर्सच्या 'मॉम'चे फोटो....