मुंबई - 'जब तक बल्ला चलता है...' अशी एक युवराजसिंगची जाहीरात होती. त्यावरुन सर्वसामान्य क्रिकटे रसिकांना क्रिकेटर्सची कमाई ही ते मैदानात कामगिरी करतात तोपर्यंतच असते, असे वाटत होते. मात्र हा समज रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर या दोन दिग्गज माजी क्रिकटर्सनी खोटा ठरविला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)
टीम इंडियाचा कर्णधार
महेंद्रसिंह धोनी आणि उपकर्णधार
विराट कोहली यांच्यापेक्षा जास्त वेतन या दोन माजी क्रिकेटर्सला देत आहे. बीसीसीआयच्या पगाराच्या क्रमवारीत रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर यांना मिळणार्या पगारानंतर धोनी तिसर्या क्रमांकावर येतो. विशेष म्हणजे या दोन्ही माजी क्रिकटर्सला मिळणार्या पगाराच्या अर्धाही पगार धोनीला मिळत नाही.
टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री आणि आयपीएलचे प्रभारीपद सांभाळणारे सुनील गावस्कर यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ वर्षाला सहा कोटी रुपये पगार देत आहे. बीसीसीआयच्या जबाबदारीसोबतच कॉमेंट्रीचा करार आणि इतर अतिरिक्त कार्यभार यांचे मिळून एकूण वेतन म्हणून हा पगार दिला जात आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुनील गावस्करला आयपीएलच्या प्रमुखपदाची जबाबादारी देण्यात आली, त्यासाठी त्याला 2.37 कोटी रुपये वर्षाला आणि रवी शास्त्रीला देखील संचालक म्हणून एवढीच रक्कम दिली जाते. याशिवाय बीसीसीआयसोबतच्या समालोचकासाठीच्या करारापोटी दोघांनाही प्रत्येकी 4 कोटी रुपये देण्यात येतात.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, धोनी आणि विराटला किती मिळतो पगार