आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'विश्वचषक-2015\'दरम्यानच कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पत्नी देईल Good News?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: साक्षीसोबत महेंद्रसिंह धोनी)

नवी दिल्ली- टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षीचे आई- बाबा बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. साक्षी फेब्रुवारीत आई बनणार असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून साक्षी एका महिला डॉक्टरच्या संपर्कात आहे. त्यामुळे विश्वचषक-2015 दरम्यानच धोनी आणि साक्षीकडून सगळ्यांना 'गुड न्यूज' मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेनंतर धोनी आता 'विश्वचषक-2015'च्या तयारीला लागला आहे. टीम इंडियाची पहिली लढत पाकिस्तानविरोधात 15 फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान, 26 वर्षीय साक्षी सध्या दिल्लीतील वसंत कुंज येथील एका नर्सिंग होममधील एका महिला डॉक्टरच्या संपर्कात आहे.
साक्षी गरोधर असल्याचे वृत्त गेल्या एप्रिलमध्ये समजले होते. मात्र, धोनीने हे वृत्त फेटाळले होते. नंतर नोव्हेंबर महिन्यात साक्षी गरोदर असल्याचे धोनीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले होते. त्यानंतर मात्र, साक्षी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात तसेच इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) दिसली नाही. विवाहानंतर पहिल्यांदाच साक्षी इतके महिने मीडियापासून लांब राहिली आहे.

4 जुलै, 2010 ला झाला विवाह...
देहरादूनपासून जवळच असलेल्या एका रिसॉर्टमध्ये 4 जुलै 2010 रोजी महेंद्रसिंह धोनी आणि त्याची प्रेयसी साक्षी रावत विवाहबद्ध झाले होते. विवाहाच्या एक दिवस आधी साक्षी आणि धोनीचा साखरपुडा झाला होता. धोनीच्या विवाह सभारंभाला हरभजन सिंह, आशीष नेहरा, रूद्र प्रताप सिंह, सुरेश रैना आणि रोहित शर्मा तसेच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर आणि बीसीसीआंचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन उपस्थिती दिली होती.

दरम्यान, धोनी आणि साक्षी हे दोघे लहानपणीचे मित्र आहेत. रांची येथील डीएव्ही श्यामली शाळेत दोघांचे प्राथमिक शिक्षण झाले. दोघांचे वडील एकाच कंपनीत कामाला होते. साक्षीचे वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर देहरादूनला तर धोनीचे वडील रांचीमध्ये स्थायिक झाले.
साक्षी आणि महेंद्रसिंह धोनीचे निवडक फोटो पाहाण्‍यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...