आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MS Dhoni Blames Indian Batsman To Loose Against England

जाणून घ्या, इंग्लंडकडून लज्जास्पद पराभवानंतर धोनी कोणाला ठरवतोय जबाबदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन - भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इंग्लंडच्या विरोधात झालेल्या लज्जास्पद पराभवासाठी भारतीय फलंदाजांना कारणीभूत ठरवले आहे. सामन्यानंतर धोनी म्हणाला की, ‘आम्ही चांगली फलंदाजी केली असे मला तरी वाटत नाही. विशेषतः आम्ही प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊनही अशा प्रकारची कामगिरी निराशाजनक असल्याचे तो म्हणाला.

धोनीची शिकवण
धोनी म्हणाला, सुरुवातीला खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती, पण आमच्या फलंदाजांनाही फारशी समाधानकारक फलंदाजी केली नाही. आम्हाला मोठ्या भागीदारी रचणे गरजेचे होते. तो पुढे म्हणाला की, जर चेंडू टोलवण्यासारखा असेल तर तसेच करायला हवे आणि बचावात्म खेळणे गरजेचे असेल तर तसे करावे. नेमकी जेव्हा वेगात धावा बनवण्याची वेळ होती तेव्हाच आमच्या हातात वीकेट नव्हती, असे धोनी म्हणाला.

स्वतः धोनीही ठरला फ्लॉप
कर्णधार धोनीही या सामन्यात फारशी समाधानकारक कामगिरी करू शकला नाही त्याला 61 चेंडूंमध्ये केवळ 34 धावाच करता आल्या. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर धोनीने म्हटले होते की, विश्वचषकापूर्वी मिळणार्‍या संधीचा अधिकाधिक उपयोग करून घ्यायचा आहे. घरापासून सुमारे चार ते साडेचार महिने दूर राहणे हे अत्यंत अवघड आहे. पण आम्हाला परिस्थितीनुसारच चालावे लागेल. आम्ही सराव करत असू तर त्याठिकाणी आम्ही कशावर जोर द्यावा, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

पुढील स्लाइड्वर पाहा, भारतीय फलंदाजांचे PHOTO