नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार धोनीला भीती वाटत नाही, असे मत सर्वाधिक वेगवान चेंडू टाकण्याचा रेकॉर्डधारक पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले आहे. तो म्हणाला, "मी खूप कर्णधार पाहिलेत, जे दबावात घाबरतात. काही कर्णधार दबावात गुडूप होतात. मात्र, धोनी असा कर्णधार आहे, जो दबावातही
आपल्या संघाचा पाठीराखा असतो. भीती काय असते, हे त्याला बहुधा माहिती नाही,' असे शोएबने म्हटले. विश्वचषकासाठी सर्वच संघांनी तयारी केली आहे. मात्र, अखेरच्या २० दिवसांत जो संघ स्वत:ला परिस्थितीनुसार बदलून घेईल, तो पुढे जाईल, असेही तो म्हणाला.