आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅच हारल्यानंतर फॅन्सच्या निशाण्यावर धोनी, स्लो बॅटिंगमुळे अशा आल्या कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दिल्लीत खेळला गेलेला दुसरा वन डे सामना भारताने 6 धावांनी गमावला. या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी कीपिंग आणि बॅटिंगमध्ये फेल ठरला. आधी त्याने किवी कर्णधार केन विलियम्सनचा 59 धावांवर एक सोपा झेल सोडला त्यानंतर त्याने शानदार 118 धावा केल्या. यानंतर धोनी फलंदाजीतही फ्लॉप ठरला. 39 धावा करताना धोनीने 59 चेंडू घेतले. त्याच्या फलंदाजीत जोष दिसत नव्हता. अखेर भारत 6 धावांनी हारला. त्यामुळे सोशल मीडियातर यूजर्सच्या निशाण्यावर धोनी आला. यूजर्सनी केले लक्ष्य....
- धोनीने जेव्हा विलियम्सनचा झेल सोडला तेव्हा तो 59 धावांवर फलंदाजी करत होता. त्यानंतर त्याने शानदार शतक ठोकले.
- या कॅचमुळे सोशल मीडियात लोकांनी धोनीची जोरदार खेचली.
- मात्र, काही लोकांनी धोनीचा बचाव केला. अनेक लोकांनी म्हटले की, विश्वास बसत नाही की धोनीही झेल सोडतो.
- धोनीने झेल सोडल्यानंतर काहींनी त्याची तुलना अरविंद केजरीवाल, राहुल गांधी आणि अभिषेक बच्चनशी केली.
- झेल सोडल्यानंतर एका यूजरने कमेंट केली की, 'कॅच सोडल्याचे कारणाने अक्षर पटेलने धोनीची तक्रार मोदीजीकडे केली पाहिजे.'
- एका यूजरने लिहले, 'आधी धोनी रनआउट झाला, आता झेल सोडला आणि हे दुर्मिळ बाबी माझ्या डोळ्याने पाहतोय."
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सोशल मीडिया यूजर्सनी कशा प्रकारे केल्या आहेत धोनीवर कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...