आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहलीच्या नेतृत्त्वात सिडनीत अखेरची कसोटी खेळू शकतो माही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - निवृत्तीची घोषणा केल्यानंतरही महेंद्रसिंह धोनी विराटच्या नेतृत्त्वात चौथ्या कसोटीसाठी मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. सहा जानेवारीपासून या कसोटीली सुरुवात होत आहे. धोनीला संघात स्टँडबाय विकेटकीपर म्हणून ठेवण्यात आले आहे. वृद्धीमान साहा तंरुस्त होऊ शकला नाही, तर धोनीला निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मैदानात उतरावे लागण्याची शक्यता आहे. कदाचित त्यामुळे रविवारी धोनी संघाबरोबर सराव करताना आढळून आला.

सहका-यांनी घेतले सेल्फी
ऑस्ट्रेलियाच्या विरोधात तिस-या कसोटीनंतर निवृत्तीची घोषणा केल्यानंतर रविवारी प्रथमच माही सहका-यांबरोबर दिसून आला. अभ्यास सत्रादरम्यान विराट कोहलीसह सर्व खेळाडुंनी धोनीबरोबर सेल्फीही घेतले. धोनीच्या घोषणेनंतर कोहली आणि रवी शास्त्री यांच्याशी त्याचे पटत नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
तिरंगी मालिकेत सहभागी होणार
कसोटी मालिकेनंतर 18 जानेवारीपासून सुरू होणा-या तिरंगी मालिकेमध्ये धोनी खेळणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाबरोबरच इंग्लंड हा तिसरा संघ असणार आहे. धोनीसह इतर खेळाडूंसाठी सर्वांनाच विश्वचषकापूर्वी आपलं कर्तृत्त्व दाकवण्यासाठी अखेरची संधी असणार आहे. 14 फेब्रुवारीपासून विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे.
पुढे पाहा, टीम इंडियाच्या सरावाचे PHOTO