आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल रंगाच्या ‘झिंग’ बेल्सच्या प्रेमात पडला धोनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंदाच्या ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्व देशांच्या खेळांइतकेच प्रेक्षकांचे आकर्षण ठरली होती, ऑस्ट्रेलियन कंपनीने तयार केलेली ‘झिंग’ ही बेल्स. स्टम्पवरून ही बेल (झिंग) खाली पडली की आतील लाल रंगाचा लाइट प्रकाशित होतो. स्टम्पशी संपर्क तुटला की रेडिओ लहरीद्वारा स्टम्पमधील लाइटही प्रकाशित होण्याचे संकेत दिले जातात. अशा या आकर्षक परंतु अतिशय महागड्या अशा ‘झिंग’ या बेल्सच्या प्रेमात भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पडला होता. भारताने विश्वचषक जिंकला असता तर त्याने या बेल्स विकत घेण्यासाठी ऑर्डरही दिली होती. मात्र भारत रविवारी अंतिम फेरीत पराभूत झाला आणि धोनीचे मनसुबे धुळीस मिळाले. मात्र आयसीसीने विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंना लाइट प्रकाशित होणारा स्टम्प भेटीदाखल दिला.
खरं तर आयसीसीने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच या ‘झिंग’ला मान्यता दिली होती. परंतु ऑस्ट्रेलियन कंपनीने आपल्याच देशातील आयपीएलच्या धर्तीवर होणार्‍या ‘बिग बॅश’ क्रिकेट स्पर्धेत या बेल्सचा प्रयोग करून पाहिला होता.
त्या स्पर्धेत मेलबर्न आणि सिडनी यांच्यातील सामन्यात ऐन निर्णायक क्षणी डेव्हिड हसी गोलंदाजाने चेंडू फेकल्यानंतर धावचीत व्हायला हवा होता. कारण चेंडूचा आघात झाल्यावर बेल उडाली, लाल लाइट पेटला. स्टम्पमधील लाइटही पेटले. मात्र बेल पूर्ववत स्टम्पवर खाली बसली. क्रिकेटच्या नियमानुसार बेल खाली पडणे गरजेचे होते, त्यामुळे हसीला नाबाद ठरविले गेले. हे तंत्रज्ञान तेथे थिटे पडल्याची जाणीव झाली.
आयसीसीने विश्वचषक स्पर्धेत मात्र या झिंग बेल्सचा वापर करून क्रिकेटरसिकांचे लक्ष वेधून घेतले.
पुढील स्लाइडमध्ये, 24 लाख रुपये बेलची किंमत