आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MS Dhoni Offers To Quit CSK Captaincy News In Marathi

चेन्नईचे कर्णधारपद नाराज महेंद्रसिंग धोनी सोडणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये आलेले नाव व क्रिकेटमधील भूमिकांबाबत गल्लत केली जात असल्याच्या आरोपाने संतापलेल्या महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे कर्णधारपद व इंडिया सिमेंट्स कंपनीचे उपाध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवली असल्याचे समजते.

टी-20 विश्वचषकासाठी बांगलादेश दौर्‍यावर असलेल्या भारतीय संघाचा कर्णधार धोनीने आपले नाव स्पॉट फिक्सिंगमध्ये घेतले जात असल्याबाबत स्पष्ट शब्दांत नाराजी आणि संताप व्यक्त केला. र्शीनिवासन यांच्याशी शुक्रवारी धोनीचे बोलणे झाले. त्यात त्याने आपला इंडिया सिमेंट कंपनीच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर करावा तसेच मला सीएसकेच्या कप्तानपदावरूनही मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली असल्याचे कळते. आतापर्यंत त्यातील कोणतीच विनंती मान्य केलेली नसली तरी याबाबत चर्चा सुरू असून लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

प्रतिमेवर होणार्‍या परिणामामुळे घेतला पवित्रा : स्पॉट फिक्सिंगची चौकशी करणार्‍या मुद्गल समितीसमोर मोदी खोटे बोलल्याचा आरोप वकिलांनी न्यायालयात केला होता. याचा वाईट परिणाम आपल्या प्रतिमेवर होत असल्याचे लक्षात आल्यानेच धोनीने हा पवित्रा घेतल्याचे समजते.