आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ms Dhoni Selection History In Indian Cricket Team

धोनीला टीम इंडियात घेण्‍यावरून झाला होता वाद, निर्माण झाली होती खळबळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- वेस्‍ट इंडीजमधील तिरंगी स्‍पर्धेचे जेतेपद मिळवून देण्‍यात महत्‍वाची भूमिका निभावणा-या कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपण सर्वोत्‍कृष्‍ट फिनिशर असल्‍याचे पुन्‍हा एकदा सिद्ध केले आहे. परंतु, धोनीचा इथंपर्यंतचा प्रवास काही सोपा राहिलेला नाही. धोनीला सर्वात पहिल्‍यांदा डिसेंबर 2004साली बांगलादेशाविरूद्धच्‍या वनडे मालिकेसाठी टीम इंडियात घेण्‍यात आले होते. परंतु, धोनीची ही निवड सहज झाली नव्‍हती. पूर्व विभागाला लॉबी निर्माण करायची होती. त्‍यासाठी त्‍यांना दीप दासगुप्‍ताला या दौ-यासाठी संघात घ्‍यायचे होते. निवडसमितीचे माजी चेअरमन किरण मोरे यांनी धोनीच्‍या निवडीवरून निवडसमितीत वाद झाला होता, असे सांगून खळबळ निर्माण केली आहे.

टीम इंडियात येण्‍याचा धोनीचा मार्ग सोपा नव्‍हता, हे किरण मोरे यांच्‍या या खुलाशामुळे सिद्ध झाले आहे. मोरे पुढे म्‍हणाले, धोनीला भुवनेश्‍वर येथे खेळताना त्‍या लोकांनी पहिल्‍यांदा पाहिले. त्‍यावेळी सर्वांनी त्‍याचे कौतुक केले होते. त्‍यानंतर त्‍याला मोहाली येथे दुलीप ट्रॉफीत खेळताना पाहिले. त्‍याच्‍या खेळाने सर्वचजण प्रभावीत झाले. त्‍यानंतर धोनीची 2003-04 साली नैरोबी येथे होणा-या मालिकेसाठी संघात निवड झाली होती. त्‍यानंतर धोनीने डिसेंबर 2004च्‍या बांगलादेशविरूद्धच्‍या वनडे मालिकेत आपल्‍या बॅटचा करिष्‍मा दाखवला.

जेव्‍हा धोनीची टीम इंडियामध्‍ये निवड झाली होती. तेव्‍हा संघात यष्‍टीरक्षकाची मोठी उणीव होती. संघाला फलंदाजी करणारा यष्‍टीरक्षक हवा होता. यष्‍टीरक्षकाने वनडे सामन्‍यातही आपल्‍या बॅटचा जलवा दाखवण्‍याची टीम इंडियाला गरज होती. त्‍यावेळी पार्थिव पटेल आणि दिनेश कार्तिक यष्‍टीरक्षण करीत होते. त्‍यांची कामगिरी निवडसमितीच्‍या अपेक्षा पूर्ण करीत नव्‍हती. हे दोघेही चांगली कामगिरी करायचे, परंतु, ते खूप लहान होते, असे किरण मोरे म्‍हणाले. त्‍यामुळे राहुल द्रविडला यष्‍टीरक्षणाची दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत असत. यष्‍टीरक्षणामुळे राहुलच्‍या फलंदाजीवर परिणाम होऊ नये, असे निवडसमितीला वाटायचे.