आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MS Dhoni Wants His Side To Keep Up Their Impressive Run

तिरंगी मालिकेच्या ट्रॉफीचे अनावरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमैका - येथे शुक्रवारपासून तिरंगी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला. भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, श्रीलंका संघाचा कर्णधार अँग्लो मॅथ्यूज आणि यजमान वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार डेवेन ब्राव्होच्या हस्ते तिरंगी मालिकेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. या वेळी सेल्कन मोबाइलचे कार्यकारी संचालक मुरली उपस्थित होते.

नारायण,रामपाल चमकले
तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजच्या सुनील नारायण (4/40) व रवी रामपालने (3/38) धारदार गोलंदाजी करून लंकेला 48.3 षटकात अवघ्या 208 धावांवर रोखले. प्रथम फलंदाजी करणार्‍या लंकेकडून सलामीवर जयवर्धने (52) व कर्णधार मॅथ्यूजने (55*) अर्धशतक ठोकले. तत्पूवी, जयवर्धनेने सलामीवीर थरंगासोबत पहिल्या गड्यासाठी 62 धावांची भागीदारी केली. मात्र, ब्राव्होने ही जोडी फोडली. त्याने थरंगाला (25) बाद केले. दरम्यान, संगकारा (17), चांदीमल (21) यांनीही चांगली कामगिरी केली. मात्र, लंकेचे तळातले सहा फलंदाज एकेरी धावा काढून तंबूत परतले. मॅथ्यूजने 77 चेंडूंत पाच चौकारांसह नाबाद अर्धशतक ठोकले. नारायण, रामपालपाठोपाठ सॅम्युअल्सने एक व ब्राव्होने दोन गडी बाद केले.