आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Michael Hussey Not Sure If He Is Ready For India Coach's Job

‘हसी’न कोचला पसंती! धोनीकडून हसीच्या नावाची शिफारस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सलग दोन दिवसांच्या अंतरात सर्वांनाच आश्चर्याचे मोठे दोन धक्के दिले. त्यामुळे चाहत्यांनाही सावरायला आता वेळ लागत आहे.

महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माइक हसीचे नाव समोर केले आहे. त्याने याबाबत हसीची तुलना ही भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्याशी केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने धोनीच्या या पसंतीची माहिती दिली. ‘गॅरी कर्स्टनसारखाच हसी हा शांत स्वभावाचा आहे. क्रिकेटमधील अनेक बारकाव्यांचे ज्ञानही त्याला आहे. त्यामुळे त्याच्या या कौशल्याचा टीम इंडियाला निश्चितपणे फायदा होईल,’ असेही तो म्हणाला. हसी हा टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये पुन्हा एकदा शांतता आणि समन्वयाचे वातावरण निर्माण करू शकतो, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. धोनीच्या नेतृत्वाखाली हसी हा चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. तिसरी कसोटी अनिर्णीत राहिल्यानंतर लगेच महेंद्रसिंग धोनीने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.

फ्लेचर यांना नारळ निश्चित
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने हसीच्या नावाची प्रशिक्षकपदासाठी घोषणा केली. यासह त्याने आता अप्रत्यक्षपणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला तत्कालीन प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांना नारळ देण्याचे संकेत दिले. आगामी विश्वचषकापर्यंतच फ्लेचर यांचा टीम इंडियासोबत प्रशिक्षकाबाबतचा करार आहे. त्यानंतर या कराराला मुदतवाढ मिळण्याची आशाही आता पूर्णपणे धूसर झाल्याचे दिसून येते.

आश्चर्यकारक निर्णय : हसी
आगामी काळात विश्वविजेत्या भारतीय संघासाठी प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावण्याचा निर्णय हा माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. धोनीने यासाठी माझ्या नावाची शिफारस केल्यानेही मी अवाक् झालो आहे, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार माइक हसीने दिली. धोनीने प्रशिक्षकपदासाठी हसीचे नाव समोर केले आहे. नुकताच हसीच्या नेतृत्वाखाली बिगबॅश चॅम्पियन पर्थ संघाने रंगतदार सामन्यात सिडनी थंडरर्सचा पराभव केला.