क्रीडा डेस्क- क्रिकेटर
युवराज सिंगचे पिता योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर हल्लाबोल केला आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत योगराज सिंग यांनी म्हटले आहे की, धोनी एक दिवस पै-पै (पैसे) साठी भिखारी होईल व त्याला भिक मागण्याची वेळ येईल. योगराज एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी धोनीची तुलना रावणाशी केली. योगराज म्हणाले, ''धोनी खूपच अहंकारी आहे. ज्या पद्धतीने रावणाचा अहंकार एक दिवस गळून पडला होता धोनीचेही तसेच होणार आहे. धोनी स्वताला रावणापेक्षा मोठा समझतो. मी माझ्या आयुष्यात त्याच्यापेक्षा नालायक व्यक्ती पाहिला नाही.
योगराज सिंग यांनी म्हटले केले आहे की, "धोनी काहीच नाही, त्याला मिडियाने क्रिकेटचा देव बनवला आहे. आज धोनी मिडियाची इज्जत करीत नाही. जर मी पत्रकार असतो तर धोनीला थप्पड लगावली असती. मिडियालाही दोषी ठरविताना योगराज यांनी म्हटले की, मिडियाने चुकीच्या माणसाला हिरो बनविले आहे. दरम्यान, योगराज सिंग यांनी केलेल्या टीकेनंतर सोशल मिडियात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. युवराज सिंगचा भारतीय संघात समावेश न होण्याला योगराज धोनीला जबाबदार धरू शकत नाहीत असे एक नेटिझनने म्हटले आहे. काहींनी धोनी अलीकडच्या काळात संघात राजकारण करीत असल्याचे म्हटले आहे तर काहींनी युवराजचे क्रिकेट करिअर योगराजमुळेच संपण्याची भीती व्यक्त केली आहे.
यापूर्वीही धोनीवर केला होता हल्लाबोल-
आयपीएल-8 च्या लिलालात जेव्हा युवराज सिंगला दिल्ली डेयरडेविल्स संघाने 16 कोटी रूपये मोजले होते तेव्हाही योगराज यांनी धोनीवर
आपला राग काढला होता. योगराज म्हणाले होते की, "आज अल्लाह ने महेंद्र सिंग धोनीच्या तोंडावर खूप मोठी चपराक मारली आहे. मला माहित नाही की युवराज, हरभजन, गंभीर यांच्यासमवेत त्याला काय समस्या आहे? उत्तर भारतीय खेळाडूंसोबत त्याला काहीतरी खटकते. तो खूपच घमेंडी आणि कमीना आहे. धोनीच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाला संभाळावे. जर तो असाच व्यक्तिगत खुन्नस काढत राहिला तर त्याच्यासाठी ते चांगले नसेल.
युवराज सिंग 2011 वर्ल्ड कपचा हिरो होता व त्याला 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' हा पुरस्कार मिळाला होता. तरीही त्याला 2015 च्या वर्ल्ड कप टीममधून वगळण्यात आले होते. युवराजच्या शिवाय
गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, हरभजन सिंहसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना संघात स्थान दिले गेले नव्हते.
टि्वटरवर योगराज यांच्यावरच टीका-
योगराज सिंग यांच्या मुलाखतीनंतर टि्वटरवर त्यांच्याविरोधात प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यांच्या वक्तव्याची खिल्लीही उडवण्यात येत आहे. योगराज सिंग आज (मंगळवारी) टि्वटरवर टॉप ट्रेडिंगमध्ये आहेत.
पुढे पाहा, नेटिझन्सनी काय काय म्हटले आपल्या प्रतिक्रियांत...