आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MS Dhoni's Contributions Cannot Be Measured In Words: Sunil Gavaskar

महेंद्रसिंग धोनीचा आश्चर्यकारक निर्णय : सुनील गावसकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबोर्न - महेंद्रसिंग धोनीने अचानकपणे कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचा घेतलेला निर्णय प्रचंड आश्चर्यकारक असल्याचे भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी म्हटले आहे. अन्य कुणालाही हा निर्णय जितका आश्चर्यकारक वाटला तितकाच मलादेखील वाटल्याचे गावसकर यांनी नमूद केले आहे.

खूप आश्चर्यकारक असला तरी हा निर्णय काही अचानकपणे घेतलेला नसावा, असेही त्यांनी म्हटले आहे. सिडनी कसोटीनंतर भारतीय संघाच्या कप्तानपदावरून तो पायउतार होईल, असे मला वाटले होते. मात्र, त्याने कसोटी क्रिकेटमधूनच संन्यास घेतला. मला अद्यापही वाटते की तो अजून २ ते ३ वर्षे क्रिकेट खेळण्याइतका सक्षम आहे, असेही त्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

विदेशातील पराभवांमुळे दबाव
विदेशातील भारतीय संघाच्या पराभवांची मालिका सुरूच असून त्याच दबावामुळे कदाचित धोनीने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला असावा, असेही गावसकर यांनी सांगितले. मेलबोर्न क्रिकेट मैदानावरील सामना ड्रॉ झाल्याने ही मालिकादेखील भारताने गमावल्याने त्याने असा निर्णय घेतला असावा. तिसर्‍या कसोटी सामन्याचा तणाव धोनीला असा निर्णय घेण्यास प्रवृत्त करणारा ठरला असावा, असेही ते म्हणाले.

धोनीने दिला आयाम
धोनीला भारतीय संघ एक चांगला फलंदाज, यष्टिरक्षक आणि दर्जेदार कप्तान म्हणून नक्कीच प्रदीर्घ काळ लक्षात ठेवेल. त्याने क्रिकेटला नवीन आयाम दिला असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याने संघाला पहिल्या स्थानापर्यंत नेऊन ठेवले.