आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: धोनीच्‍या चेह-यावर केक लावून मित्रांनी केले B\'DAY सेलिब्रेशन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्ट ऑफ स्‍पेन- टीम इंडियाला नवी उंची मिळवून देण्‍याचा करिष्‍मा करणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा रविवारी (7 जुलै) वाढदिवस होता. धोनीने सहकारी खेळाडू आणि वेस्‍ट इंडीजच्‍या काही क्रिकेटपटूंबरोबर वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा देणा-या चाहत्‍यांचे धोनीने याप्रसंगी आभारही मानले. केक कापल्‍यानंतर सहकारी खेळाडूंनी त्‍याच्‍या चेह-याला आणि केसांना केक लावला.

धोनीच्‍या नेतृत्‍वाखाली भारताने वर्ष 2007मध्‍ये टी-20चा विश्‍वचषक, वर्ष 2011मध्‍ये वनडे विश्‍वचषक आणि नुकताच झालेल्‍या आयसीसी चॅम्पियन्‍स ट्रॉफीचे जेतेपद मिळवून दिले. त्‍यानेच टीम इंडियाला कसोटी आणि वनडे क्रमवारीत भारताला अव्‍वल स्‍थान मिळवून दिले होते. वेस्‍ट इंडीज येथे सुरू असलेल्‍या तिरंगी मालिकेच्‍या पहिल्‍या सामन्‍यात हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे त्‍याला संपूर्ण मालिकेतून बाहेर व्‍हावे लागले आहे. त्‍यामुळे त्‍याला झिम्‍बाब्‍वे दौ-यासाठी विश्रांतीही देण्‍यात आली आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...