आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या या खेळाडूकडून शिकण्यासारखे खूप काही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन माझ्यासह अनेक युवकांचे प्रेरणास्थान आहे. 24 वर्षे सतत खेळून इतके मोठे यश जर सचिन मिळवू शकतो तर मग आपण आपल्या खेळात चांगली कामगिरी का करू शकत नाही, असा प्रश्न इतर खेळांतील खेळाडूंना पडतो. हाच प्रश्न चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित करतो. सचिन स्वत: चालता-बोलता लिजेंड आहे. त्याची प्रत्येक कृती एक आदर्श आहे.
मी आणि सचिन एकाच कॉलेजचे विद्यार्थी. तसा सचिन पुढे कधीच कॉलेजात आला नाही हा भाग निराळा. मात्र, त्याने आमच्या दादरच्या कीर्ती कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतले होते. त्याचे वडील आम्हाला शिकवायला होते. तेव्हापासून सचिनची ओळख आहे.
सचिन हा असा मनुष्य आहे, जो भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपला वाटतो. प्रत्येकाला सचिनवर आपला
हक्क वाटतो. सचिनमध्ये प्रत्येक जण स्वत:चा शोध घेत असतो. म्हणूनच
सचिन सर्वार्थाने ग्रेट आहे. सचिन खरा खेळाडू आहे. तो चढ-उतारातून गेल्याचे मी पाहिले आहे. सचिनची निवृत्ती मनाला चटका लावून जाणारी असून, त्याची उणीव मैदानावर जाणवेल.
(राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेती महिला नेमबाज.)