ब्रुंसब्यूटे- जर्मनीच्या ब्रुंसब्यूटे शहरामध्ये आयोजित मड ऑलिंम्पिक मध्ये शेकडो तरुण-तरुणींनी सहभाग घेतला असून गोल करण्यासाठी त्यांच्यामध्ये चांगलीच चूरस पाहायला मिळाली. मड (चिखल) ऑलिंम्पिकमध्ये फुटबॉल, हँडबॉल, आणि व्हॉलीबॉल या खेळांचे आयोजन केले होते.
दर वर्षी होते आयोजन
चिखल ऑलिम्पिक जर्मनीमध्ये प्रत्येक वर्षी आयोजित केल्या जातो. गेल्या वर्षी हा खेळ 28 जुलै रोजी आयोजित केला होता. त्यावेळी 400 हून अधिक युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. यावर्षीच्या मड ऑलिंम्पिकमध्ये 500 तरुण -तरुणी सहभागी होत आहेत.
(फोटोओळ- चिखलामध्ये फुटबॉल खेळताना युवक आणि युवती)
पुढील स्लाइडवर पाहा, चिखलामध्ये जिंकण्याच्या ईर्षेने खेळत असलेले खेळाडू..