आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mudgal Committee News In Marathi, Gurunath Mayappan, N.Srinivasan

स्पॉट फ‍िक्सिंग : श्रीनिं-मयप्पनची अजून चौकशी नाही, मुद्गल समितीचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - आयसीसीचेअरमन एन. श्रीनिवासन आणि त्यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांची अजून चौकशी केली नसल्याचे मुद्गल समितीने स्पष्ट केले आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाने मुद्गल समिती स्थापन केली आहे. श्रीनिं आणि मयप्पनची चौकशी झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते. त्यावर हे स्पष्टीकरण आले आहे.

मुद्गल समितीची १५ १६ ऑगस्टला चेन्नईत बैठक झाली होती. त्यात काही संघ तसेच इतर संबंधित बाबींची चौकशी झाल्याचे वृत्त होते. बीसीसीआयचे खजनिदार अनिरुद्ध चौधरी चौकशी समितीचे सचवि व्ही.सिंघानिया यांनी एक संयुक्त पत्र प्रसदि्ध केले असून भारतीय खेळाडूंच्या चौकशीसाठी समिती इंग्लंडला जाणार असल्याच्या वृत्ताचेही खंडण केले आहे. या बैठकीत श्रीनिवासन अथवा मयप्पनची कोणतीही चौकशी झाली नाही. उच्च न्यायालयाने १६ ऑगस्टला दुसऱ्या टप्प्याच्या चौकशीचा आदेश दिला होता. तेव्हापासून आतापर्यंत एकही चौकशी झाली नसल्याचे समितीने पत्रकात म्हटले आहे.
मालिकेदरम्यान चौकशीने खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ शकते हे समिती ओळखून आहे, असे पत्रकात नमूद आहे. उल्लेखनीय म्हणजे, आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात नाव गोवले जाताच उच्च न्यायालयाने श्रीनिवा सन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून तात्पुरते निलंबित केले होते. समितीला याप्रकरणाचा अंतिम अहवाल ऑगस्ट शेवटपर्यंत सादर करायचा आहे.