नवी दिल्ली -
इंडियन प्रीमियर लीगमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सोमवारी न्या. मुकुल मुद्गल समितीने
आपला चौकशी अहवाल सादर केला आहे. श्रीनिवासन आणि गुरुनाथ मयप्पन यांचे भाग्य सीलबंद असलेल्या लिफाफ्यातील अहवालावर येत्या १० नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
न्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ या अहवालाची सुनावणी करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन फिक्सिंग प्रकरणात मुख्य संशयित आहे. त्यामुळे त्याचे आणि श्रीनिवासन यांचे भाग्य या लिफाफ्यात बंद झालेले आहे. तसेच या अहवालात नाव आढळल्यास श्रीनिवासन यांच्या अध्यक्षपदावर गदा येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी विंदू सिंगचेही नाव आहे. विंदू आणि मयप्पन यांच्यात फिक्सिंग प्रकरणी दूरध्वनीवरून चर्चा झाली होती.