आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयाने मुंबईचे आव्हान कायम !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने शुक्रवारी ‘करा वा मरा’ सामन्यात विजय मिळवून चॅम्पियन्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. या संघाने हायवेल्ड लायन्सवर 7 गड्यांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना लायन्सने 5 बाद 140 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने 18.3 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. सलग दुस- या सामन्यात मुंबईच्या सचिनने (5) चाहत्यांची घोर निराशा केली.
नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थकी लावला. दक्षिण आफ्रिकेच्या लायन्स टीमने पाच गड्यांच्या मोबदल्यात 81 धावा काढल्या होत्या. त्यानंतर एल्विरो पीटरसन (35) आणि डिवाइन प्रिटोरियस (31) यांनी नाबाद खेळी करून संघाचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 59 धावांची अभेद्य भागीदारी केली. तत्पूर्वी, इतर फलदांज स्वस्तात बाद झाले. गोलंदाजीत प्रज्ञान ओझाने 26 धावा देऊन दोन विकेट घेतल्या. मिशेल जॉन्सन, ऋषी धवन आणि हरभजनने प्रत्येकी एक गडी बाद केला.


स्मिथचे नाबाद अर्धशतक
सामनावीर ड्वेन स्मिथ व केरोन पोलार्डने अभेद्य 51 धावांची भागीदारी करून मुंबईला विजय मिळवून दिला. स्मिथने 47 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांसह 63 धावा काढल्या. पोलार्डने 20 चेंडूंत दोन चौकार व तीन षटकार ठोकून 32 धावा काढल्या.


संक्षिप्त धावफलक
हायवेल्ड लायन्स : 5 बाद 140 (पीटरसन नाबाद 35,2/26 ओझा), मुंबई : 3 बाद 141 (स्मिथ नाबाद 63).