आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिने अभिनेता रणबीर कपूरच्या मुंबई सिटी एफसीने सचिनच्‍या केरळाचा उडविला धुव्‍वा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिने अभिनेता रणबीर कपूरच्या मुंबई सिटी एफसी संघाने इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नोंद केली. यजमान मुंबई संघाने रविवारी पाहुण्या केरला ब्लास्टर्सवर 1-0 अशा फरकाने मात केली. एन.अनेल्काने 45 व्या मिनिटाला गोल करून मुंबईला घरच्या मैदानावर शानदार विजय मिळवून दिला. या विजयासह मुंबईच्या संघाने गुणतालिकेत पाचव्या स्थानी धडक मारली. सचिनच्या केरला संघाचा आयएसएलमधील हा तिसरा पराभव ठरला.
पुणे-युनायटेड आज सामना
इंडियनसुपर लीगमध्ये सोमवारी पुणे एफसी आणि नॉर्थ ईस्ट युनायटेड यांच्यात सामना रंगणार आहे. घरच्या मैदानावर शानदार विजय मिळवण्याचा यजमान पुणे संघाचा प्रयत्न असेल. आतापर्यंत पुणे संघाला चारपैकी एका लढतीत विजय मिळवता आला. यासह पुणे संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. तसेच युनायटेड संघ पाचपैकी दोन सामन्यांतील विजयासह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोच एंटोनिओ हबासवर दोन सामन्यांची बंदी