आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Cricket Association Want To Celebrate Sachin's 200 Th Test

सचिनच्या 200 वी कसोटीच्या सेलिब्रेशनसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन मैदानात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सचिन तेंडुलकरच्या 200 व्या कसोटीचे ‘मार्केटिंग’ करण्याची दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाची संधी बीसीसीआयने हिरावून घेतली असली तरीही त्याच हेतूने आता मुंबई क्रिकेट असोसिएशन मैदानात उतरले आहे.
बीसीसीआयने निश्चित केलेल्या क्रमवारीनुसार येत्या वर्षभरात मुंबईच्या वाट्याला एकही कसोटी सामना येणार नाही. त्या मुळे वेस्ट इंडीजविरुद्ध होणारी दुसरी कसोटी मुंबईच्या वाट्याला निश्चित येणार नाही.


हा कसोटी सामना सचिन तेंडुलकरचा 200 वा कसोटी सामना असेल. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने बीसीसीआयला त्या सामन्याच्या आयोजनाची संधी देण्याची विनंती करण्यात येणार आहे. मुंबईने बीसीसीआयला सध्याच्या अडचणीच्या काळात कोशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून हात दिला होता. या महिन्यात होणा-या वार्षिक सर्वसाधारण सभेतही मुंबई क्रिकेट संघटनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे मुंबईने या सामन्यासाठी लेखी स्वरूपात विनंती केल्यास ती अव्हेरली जाण्याची शक्यता नाही. मुंबईची विनंती मान्य झाल्यास सचिन तेंडुलकरच्या दोनशेव्या कसोटी सामन्याचा एक मोठा ‘इव्हेंट’ करण्याची योजना मुंबई क्रिकेट असोसिएशनने आखली आहे. सचिनचा त्याच्या कर्मभूमीत, मुंबईत यथोचित गौरव करण्याची योजना आहे.