आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई’च्या ऋणातून मुक्त होण्याची संधी - संदीप पाटील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई क्रिकेटची सध्याची कामगिरी अधिक चांगली व्हावी यासाठी मी पुन्हा एकदा मुंबई क्रिकेटच्या निवड समितीवर काम करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई रणजी व 25 वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या संदीप पाटील यांनी व्यक्त केली.
गतवर्षी, स्थानिक क्रिकेटमधील सामने पाहण्यासाठी आपण पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. त्यामुळे आपण अध्यक्षपद मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला, असे सांगून संदीप पाटील पुढे म्हणाले, मात्र यंदा
स्पर्धेतील काही ठरावीक सामने पाहून गुणवंत खेळाडूंना मुंबईच्या संघात संधी देण्यास आपण कटिबद्ध आहोत. यातूनच खर्‍या अर्थाने प्रतिभावंत खेळाडूंना चमकण्याची संधी मिळू शकेल.
मुंबईच्या क्रिकेटने मला भरपूर दिले. काहीअंशी त्याची परतफेड करण्याची संधी मला मिळाली तरी मी निश्चितच ती संधी साधू शकेन, असा विश्वास मला आहे, असे पाटील पुढे म्हणाले. अलीकडेच निवृत्त झालेल्या अजित आगरकर यालाही मुंबई संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्याची गळ सध्या घालण्यात येत आहे.