आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai High Court Directs To Appoint New Inquiry Committee In Spot Fixing Scandal

स्‍पॉट फिक्सिंगः नवी चौकशी समिती नेमा, उच्‍च न्‍यायालयाचे बीसीसीआयला निर्देश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आयपीएलमधील स्‍पॉट फिक्सिंगप्रकरणी मुंबई उच्‍च न्‍यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दणका दिला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्‍यासाठी बीसीसीआयने नेमलेली समिती न्‍यायालयाने अवैध ठरविली आहे. न्‍यायालयाने याप्रकरणाची चौकशी करण्‍यासाठी नविन समिती स्‍थापन करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहे.

स्‍पॉट फिक्सिंग प्रकरणातून बीसीसीआयचे माजी अध्‍यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांना वाचवण्याचा प्रयत्‍न केल्‍याचे बीसीसीआयच्‍या चौकशीतून दिसून येत होते. याप्रकरणाची चौकशी केल्‍यानंतर समितीने राज कुंद्रा, मयप्‍पन आणि एन. श्रीनिवासन यांना क्‍लीन चिट दिली होती. हा अहवाल मुंबई पोलिसांनी फेटाळला आहे. तसेच गुरुनाथ निर्दोष नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे असून ते कोर्टात सादर केले जातील, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, केंद्र सरकार व क्रीडा सचिवांनीही बोर्डाचा चौकशी अहवाल फेटाळला आहे. बीसीसीआयची चौकशी समिती स्‍वतः अध्‍यक्ष एन. श्रीनिवासन यांनी नेमली होती. त्‍यामुळेच ही समिती न्‍यायालयाने अवैध ठरविली आहे.