आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Indians Aditya Tare Celebrates Football Style In IPL 7 News In Hindi

IPL-7 मध्ये ख-या अर्थाने वाघ ठरले मुंबई इंडिन्स, पहा क्रेझी सेलेब्रिशनचे काही फोटोज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रीडा डेस्क - अथक परिश्रमानंतर मिळालेल्या विजयाचा आनंद काही औरच असतो. जेव्हा एका चेंडूवर विजय किंवा पराभव ठरतो त्यावेळी तर खेळाडुंचा उत्साह पाहण्यासारखा असतो. रविवारी रात्री मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरही मुंबई इंडियन्सच्या खेळाडुंचा अशाच उत्साह पहायला मिळाला.
88 चेंडूमध्ये 195 धावांचा विक्रम करणारा मुंबईचा संघ आयपीएल-7 च्या प्ले ऑफमध्ये पोहोचला. या विजयाचे सर्वात मोठे श्रेय कोरी अँडरसनच्या वादळी 95 धावांच्या खेळीला जाते. पण 15 व्या षटकांत निर्णायक चेंडूवर षटकार खेचत आदित्य तारेने त्याचे श्रेय पळवले.

त्या चेंडूआधी मुंबईच्या सर्व आशा संपुष्टात आल्या होत्या. पण आदित्यने विजयी षटकार मारला आणि मुंबईने एलिमिनेटररमध्ये प्रवेश केला. षटकार लगावताच उत्साह दाखवत टी शर्ट वर करून तो धावत सुटला. अशा प्रकारचे सेलिब्रेशन आतापर्यंत फुटबॉलमध्ये पाहायला मिळाले होते. सचिनही या विजयाने आनंदी होता, त्यानेही वेळ मिळताच आदित्यचे कौतुक केले.
पुढे पहा मुंबईच्या सेलिब्रेशनचे काही निव़ड़क फोटोज...