आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : मुंबईचा पहिला विजय, १८ धावांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पराभूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - सलगच्या पराभवाची मालिका खंडित करून मुंबई इंडियन्स संघ अाठव्या सत्राच्या अायपीएलमध्ये विजयी ट्रॅकवर परतला. मुंबई संघाने रविवारी यजमान राॅयल्स चॅलेंजर्स बंगळुरूवर १८ धावांनी मात केली. यासह मुंबई संघाने यंदाच्या सत्रात पहिल्या विजयाची नाेंद केली. हरभजनच्या (३/२७) गाेलंदाजीच्या बळावर मुंबईने विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईने राेहित शर्मा (४२), सिमन्स (५९), उन्मुक्त चंदच्या (५८) झंझावाताच्या बळावर ७ बाद २०९ धावा काढल्या हाेत्या. खडतर अाव्हानाच्या प्रत्युत्तरात यजमान बंगळुरू संघाने १९१ धावांत गाशा गुंडाळला. संघाकडून डिव्हिलर्सने ४१ धावा काढल्या. वीसने नाबाद ४१ धावांची खेळी केली.

राे‘हिट’चा झंझावात
मुंबई इंडियन्सच्या राेहित शर्माने झंझावाती खेळी केली. त्याने १५ चेंडूंचा सामना करताना ४२ धावा काढल्या. यात तीन षटकार अाणि चार चाैकारांची तुफानी फटकेबाजी केली. यासह त्याने संघाच्या धावसंख्येला गती दिली.

वीसचे ४ बळी
पदार्पणातील सामन्यात डेव्हिड वीसने बंगळुरूकडून चार विकेट घेतल्या. त्याने एकाच षटकात तीन गडी बाद केेले. त्याने चार षटकांत ३३ धावा देत सामन्यात हे यश मिळवले.

पाेलार्डची ताेंडाला पट्टी
मुंबई इंडियन्स व बंगळुरू यांच्यातील सामन्यात विंडीजच्या क्रिस गेल-पाेलार्ड या दाेघांत वाद झाला. पंच रिचर्डसन, विनीत कुलकर्णी यांनी पाेलार्डला ताकीद दिली. त्यामुळे त्याने ताेंडावर सेलाे टेप लावला. पाेलार्डला पाहून प्रशिक्षक रिकी पाँटिंग अाणि राॅबिन सिंग या दाेघांनाही हसू अावरते अाले नाही. याची मीडियातही माेठी चर्चा रंगली हाेती.