आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारेच्या सिक्सरने शिल्पाचे हसू गेले अन् आसू आले, मुंबईचा जल्लोष...पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रविवारी 25 मेच्या रात्री वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या यंदाच्या अखेरच्या लीग सामन्यात मुंबईने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाने मुंबई प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. तर राजस्थान रॉयल्सला मात्र घरी परतावे लागले आहे.

शिल्पाची उपस्थिती व्यर्थ
संपूर्ण पर्वामध्ये शिल्पा शेट्टी फार कमी वेळ मैदानावर उपस्थित होती. पण अखेरच्या सामन्यात मालकीनबाई संघाचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी आवर्जुन उपस्थित होत्या. संपूर्ण सामन्यात त्या संघासाठी चिअरही करत होत्या. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही, आणि संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

नीता अंबानींच्या चेह-यावर हसू फुलले
मुंबई इंडियन्सच्या ओनर नीता अंबानी सामन्यादरम्यान भलत्याच तणावात होत्या. त्यांच्या चेह-यावर चिंता स्पष्टपणे जाणवत होती. पण मॅचचा शेवट गोड झाल्याने अखेर त्यांच्या चेह-यावर हसू फुलले. संघ प्ले ऑफसाठी पात्र होताच त्या मैदानात पोहचल्या आणि त्यांनी एकच जल्लोष सुरू केला. सचिनबरोबर मैदानावर फिरून त्यांनी चाहत्यांचे अभिनंदनही केले.

पुढील स्लाईडस्वर पहा फोटोज...