आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Indians Vs Pune Warriors Ipl Match Live Score

IPL: मुंबई इंडियन्‍सच्‍या वादळासमोर पुणे वॉरियर्स नेस्‍तनाबूत !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- फलंदाजीती रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि सचिन तेंडुलकरचे तर मिचेल जॉन्‍सनच्‍या भेदक गोलंदाजीच्‍या जोरावर मुंबई इंडियन्‍सने पुणे वॉरियर्सवर दणदणीत विजय नोंदवला. 184 धावांचे आव्‍हान घेऊन उतरलेल्‍या पुणे वॉरियर्सला पहिल्‍याच चेंडूवर जॉन्‍सने धक्‍का दिला. या धक्‍क्‍यानंतर पुण्‍याला सावरताच आले नाही. त्‍यांच्‍या फलंदाजांनी मैदानात फक्‍त हजेरी लावण्‍याचेच काम केले. मिचेल मार्श (38 धावा), युवराज सिंग (24 धावा) आणि टी सुमन (23 धावा) यांनीच थोडाफार प्रतिकार केला. मुंबईने पुण्‍याचा 41 धावांनी पराभव केला. मुंबईकडून मिचेल जॉन्‍सनने 3 गडी टिपले. तर ओझा, हरभजनसिंग, पोलार्ड आणि मलिंगाने 1-1 गडी टिपला. मुंबईच्‍या सांघिक कामगिरीचा हा विजय ठरला. मुंबईच्‍या क्षेत्ररक्षकांनी काही प्रेक्षणीय झेल टिपले. मुंबई इंडियन्‍सच्‍या डावाविषयी आणि या सामन्‍यातील फोटो पाहण्‍यासाठी पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करा...