आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Indians Vs Rajasthan Royals IPL 7 Match Score In Marathi

आदित्यच्या षटकाराने मुंबई उपांत्य फेरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएलमध्ये रविवारी चुरशीच्या लढतीत मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून उपांत्य फेरीत झोकात प्रवेश केला. आदित्य तारेच्या या कामगिरीने राजस्थान रॉयल्सचे स्वप्न भंगले.
मुंबईला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी 14.3 षटकांत 190 धावांची गरज होती. मात्र, या निर्धारित षटकांमध्ये मुंबईने 189 धावा केल्याने राजस्थानने जल्लोष सुरू केला. एवढ्यात पंचांनी निर्णय दिला की, ‘पुढील चेंडूवर फलंदाजाने चौकार लगावला तर मुंबई बाद फेरीसाठी पात्र ठरेल.’ हा चेंडू आदित्य तारेला खेळावयाचा होता. समोर गोलंदाजीला होता जेम्स फॉकनर. त्यानेही चाल खेळली. हा चेंडू चक्क फुलटॉस दिला. आदित्यने तो अचूकपणे बॅटवर घेत सीमापार पाठवला. या सामन्यानंतर मुंबई आणि राजस्थान या दोन्ही संघांचे प्रत्येकी 14 सामन्यांतून समान 14 गुण झाले होते. मात्र, मुंबईला चांगल्या धाव सरासरीचा फायदा मिळाला.