आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल : चेन्नईवर मुंबईचे साम्राज्य !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - केरोन पोलार्डच्या (नाबाद 51) अर्धशतकानंतर गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर मुुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्जला 9 धावांनी हरवले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 148 धावा काढल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला 9 बाद 139 धावाच काढता आल्या.
धावांचा पाठलाग करताना चेन्नईकडून कर्णधार धोनीने 26 चेडूंत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 51 धावा काढल्या. हसीने 20 तर जडेजाने 16 धावा काढल्या. चेन्नईच्या इतर फलंदाजांनी निराशा केली. मुंबईकडून मुनाफ पटेलने 3 गडी बाद केले.
तत्पूर्वी, मुंबईकडून सचिन शून्यावर, तर पाँटिंग 6 धावा काढून बाद झाला. मधल्या फळीचे फलंदाज रोहित शर्मा (8) आणि अंबाती रायडू (7) सुद्धा लवकर बाद झाले. हे खेळाडू बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिकने 37 धावांची खेळी करून धावसंख्या वाढवली. मुंबईने आपल्या 6 विकेट अवघ्या 83 धावांत गमावल्या होत्या. मात्र, पोलार्डने (57) हरभजनसिंगच्या (नाबाद 21) मदतीने सातव्या विकेटसाठी आठ षटकांत 65 धावांची अभेद्य भागीदारी करून मुंबईला सन्मानजनक स्कोअर उभारून दिला. मुंबईने 20 षटकांत 6 बाद 149 धावा काढल्या. मुंबईकडून दिनेश कार्तिक, केरोन पोलार्ड आणि हरभजनसिंग यांनाच दोनअंकी धावसंख्या गाठता आली. इतर फलंदाजांनी निराशा केली.

पोलार्ड लढला
मुंबईची टीम 8 बाद 83 धावा अशी संकटात सापडली असताना कॅरेबियन स्टार केरोन पोलार्डने नाबाद अर्धशतक झळकावले. पोलार्डने अवघ्या 38 चेंडूंत 5 उत्तुंग षटकार आणि 4 चौकारांसह 57 धावा ठोकल्या. हरभजनसिंगने 21 चेंडूंत 1 षटकार आणि एका चौकारासह नाबाद 21 धावा जोडल्या. चेन्नईकडून डॅरेन ब्राव्होने 44 धावांत 2 गडी बाद केले. नॅनेस, राजपूत, लॉफलिन आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.