आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- दहावी आंतरराष्ट्रीय मुंबई मॅरेथॉन स्पर्धा मोठया उत्साहात पार पडली. चित्रपटसृष्टीतील कलाकार, उद्योगपती, आबाल-वृद्ध, सेलिब्रेटीजनी या मॅरेथॉनमध्ये आपला सहभाग नोंदवला. पूर्ण मॅरेथॉनमध्ये युगांडाच्या जॅक्सन किपरूप याने पुरूष गटात, तर महिला गटात केनिया वेलोंटिन किपस्टर यांनी विजय मिळवला. भारतीय गटात बिनिंग ल्यांगखाई याने तिस-यांदा मॅरेथॉन जिंकण्याचा पराक्रम केला.
या मॅरेथॉनमध्ये 35 स्पर्धक सहभागी झाले होते. पूर्ण मॅरेथॉनमध्ये युगांडाच्या जॅक्सन किपरूप याने 2 तास 9 मिनिटे 32 सेकंदात अंतर पार केले. त्याला चार हजार अमेरिकन डॉलरचे बक्षिस देण्यात आले. दुस-या स्थानावरील जेक जेसारी याने 2 तास 9 मिनिटे 43 सेकंदाची वेळ नोंदवली. पूर्ण मॅरेथॉनमध्ये भारतीय गटात बिनिंग ल्यांगखाई याने 2 तास 22 सेकंदाची वेळ नोंदवत पहिले स्थान मिळवले. आशिष सिंग दुस-या आणि इलम सिंग तिस-या स्थानी राहिला.
पुरूषांची अर्धमॅरेथॉन नितेंद्र सिंगने 1 तास सहा मिनिटे आणि 16 सेकंदात पार करून पहिला क्रमांक पटकाविला. सचिन पाटील दुस-या आणि आतवा भगत तिस-या स्थानी राहिला. महिला गटात आंतराष्ट्रीय धावपटू सुधा सिंगने अपेक्षेप्रमाणे पहिला, रितू पालने दुसरा तर मोनिका आथरेने तिसरा क्रमांक पटकाविला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.