आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई मॅरेथॉन :ललिता बाबरची विक्रमी धाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ललिता बाबरने रविवारी 11 व्या स्टॅँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनमध्ये नव्या विक्रमासह अव्वल स्थान गाठले. तिने महिला गटात 2 तास 50 मिनिटे 31 सेकंदांत शर्यतीचे निश्चित अंतर पूर्ण केले. तिचा हा यंदाच्या सत्रात नवा कोर्स विक्रम ठरला. यापूर्वी तिने गतवर्षी 2 तास 53 मि. 35 सेकंदांत शर्यत पूर्ण केली होती. या गटात परभणीच्या ज्योती गवतेने (3:02:59से.) तिस-या स्थानी धडक मारली. विजयमाला पाटीलने (2:59:58से.) दुसरा क्रमांक पटकावला. विक्रमी धाव घेणा-या ललिताला अतिरिक्त एक लाखाचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले.


इवान्स, मेकाशे चॅम्पियन
केनियाच्या इवान्स रुटोने पुरुष आणि इथिओपियाच्या डिकनेश मेकाशने महिला गटातील मॅरेथॉन जिंकली. रुटोने दोन तास नऊ मिनिटे आणि 33 सेकंदांत शर्यत पूर्ण केली.
भारतीय गटात पुरुष गटात करणसिंगने 2 तास 24 मिनिटे 08 सेकंदांत शर्यत जिंकली. राशपालसिंग दुसरा व बिनिंगने तिसरे स्थान गाठले.
या वेळी नेहा धुपिया, दिया मिर्झासह राज्य ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील, राज्य पर्यटनमंत्री छगन भुजबळ, युवा सेनेचे आदित्य ठाकरे उपस्थित होते. मॅरेथॉनमध्ये अनिल अंबानींसह आरबीआयचे रघुराम राजन सहभागी झाले होते.


कविता राऊत दुस-या स्थानी
आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या कविता राऊतने 21 किमी अंतराच्या हाफ मॅरेथॉनमध्ये दुसरे स्थान पटकावले. तिने 1 तास 21 मिनिटे 15 सेकंदांत शर्यत पूर्ण केली. या गटात सुधासिंगने अव्वलस्थानी धडक मारली. तिने 1 तास 18 मिनिटे 24 सेकंदांत शर्यत जिंकली.