आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- मुंबईने रणजी चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. पावसामुळे तब्बल अडीच दिवसांचा खेळ वाया गेल्यानंतर मुंबईने सेनादलचा पहिला डाव गुंडाळून पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत मुंबई विरुद्ध सौराष्ट्र अशी लढत रंगणार आहे.
मुंबईने पहिला डाव 8 बाद 454 धावांवर घोषित केला होता. परंतु, पावसामुळे बराच खेळ वाया गेला. आज सामन्याचा राखीव दिवस होता. मुंबईला सेनादलाने दमदार प्रत्युत्तर देत काल 3 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली होती. आज मुंबईच्या गोलंदाजांनी सेनादलाचा डाव 240 डावांमध्ये कुंडाळून 214 धावांची आघाडी मिळवून दिली. त्याच्या जोरावर मुंबईने अंतिम फेरीत धडक दिली. धवल कुलकर्णीने 5 तर शार्दुल ठाकूरने 3 बळी घेतले.
शार्दुल ठाकूरने कालचा नाबाद फलंदाज यशपाल सिंगला 58 धावांवर बाद केले. सोमय्या स्वाईन आणि यशपाल सिंग यांनी 3 बाद 72 अशा स्थितीवरुन शतकी भागीदारी करत डाव सावरला होता. ही जोडी फुटल्यानंतर सेनादलाचा डाव गडगडला. स्वाईन 74 धावांवर बाद झाला आणि पाठोपाठ उर्वरित फलंदाजही आल्यापावली परतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.