आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी क्रिकेट : मुंबई-सौराष्ट्र फायनल आजपासून

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - तब्बल सहा वर्षांनी रणजी क्रिकेट स्पर्धेच्या वर्चस्वासाठी यजमान मुंबई आणि प्रथमच अंतिम फेरी गाठणारा सौराष्ट्र संघ यांच्यात अंतिम सामना होत आहे. शनिवारपासून सुरू होणा-या या अंतिम सामन्यासाठी मुंबईकर क्रिकेटरसिकांनीही उत्साह दाखवला आहे.

सहा वर्षांपूर्वी बंगालला हरवून मुंबईला विजेतेपद पटकावून देताना सचिन तेंडुलकर आणि जहीर खान ही मुंबईची आंतरराष्ट्रीय कीर्तीची जोडगोळी खेळली होती. यंदाही तो योग जुळून आला होता. मात्र, जहीर खान जायबंदी झाल्यामुळे तो क्षण हुकला. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यापासून स्थानिक क्रिकेट फारच गंभीरपणे घेतले आहे. सरावाला सर्वांच्या आधी येत आहे. महत्त्वाच्या सामन्याआधी आजूबाजूच्या परिस्थितीचा किती सखोलपणे विचार करायचा याचे प्रात्यक्षिक त्याने इतरांना दाखवून दिले. साइटस्क्रीन हा नेहमीच नाजूक विषय असतो. त्याची योग्य जागा न निश्चित केल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कोणती नेमकी जागा महत्त्वाची आहे, ते सचिनने पाहिले.

मुंबई संघाने अन्य संघांप्रमाणे निर्णायक विजय न मिळवता हळूहळू स्पर्धेवर वर्चस्व मिळवत नेले. मुंबई संघाचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी म्हणाले, ‘उपांत्य फेरीच्या सामन्यात शार्दूल ठाकूर व धवल कुलकर्णी यांनी ‘फॉर्म पिक अप’ केला ही मुंबईसाठी मोठीच जमेची बाजू आहे.’सचिनच्या समावेशामुळे फलंदाजीला परिपक्वता आली आहे. जाफरचा अनुभव आणि फॉर्म मुंबईला फायदेशीर ठरला आहे.