आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रैनाचे आक्रमक शतक: शेष भारत सर्वबाद 526, मुंबईचे दमदार प्रत्युत्तर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाने रणजी विजेत्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात आक्रमक शतक झळकावत 134 धावांची धुव्वाधार खेळी केली. रैना व काल शतक ठोकलेल्या मुरली विजयच्या खेळीमुळे पाचदिवसीय इराणी करंडकात शेष भारत पहिल्या डावात सर्वबाद 526 धावांचा डोंगर उभारला. दरम्यान, प्रत्युत्तरादाखल मुंबईने जोरदार उत्तर दिले असून, सलामीवीर वसिम जाफर आणि अजिंक्य रहाणे या जोडीने दुस-या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी करीत 132 धावा जोडल्या. जाफर दिवसाची शेवटची पाच-सहा षटके बाकी असताना 80 धावांवर बाद झाला. सलामीवीर तरे 6 धावा काढून बाद झाला. दुस-या दिवसअखेर मुंबईने 2 बाद 155 धावा केल्या आहेत. रहाणे 55 तर थाकूर 4 धावांवर नाबाद होते.

भारताच्या वन डे संघातील फलंदाज सुरैश रैनाने 134 धावांची तर, तामिळनाडूचा सलामीवीर मुरली विजयने 116 धावांची शानदार खेळी करून टीम इंडियाच्या संघात आपली दावेदारी मजबूत केली आहे. शेष भारताकडून आज दुस-या दिवशी रैना आणि अभिमन्यू मिथून या जोडीने सकाळचे सत्र गाजवले. मिथून 90 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह 51 धावा काढल्या. तर, रैनाने आक्रमक फटकेबाजी करीत 169 चेंडूत 14 चौकार आणि 5 षटकारांसह 134 धावांची धुव्वाधार खेळी केली.

महिला वर्ल्डकप : कर्णधार मिताली राजच्या दमदार नाबाद शतकामुळे भारताची पाकिस्तानवर मात