आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईने जिंकली रणजी ट्रॉफी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईची टीम पुन्हा रणजी चॅम्पियन बनली आहे. मुंबईने सोमवारी सौराष्‍ट्रा ला एक डाव आणि 125 धावांनी पराभूत करून विजेतेपद पटकावले. रणजीच्या इतिहासात मुंबईची टीम तब्बल 40 वेळा चॅम्पियन बनली. विजेत्या टीमचा सलामीवीर वसीम जाफर ‘मॅन ऑ फ द मॅच’चा मानकरी ठरला.

तिस-या दिवशी संपलेल्या सामन्यात मुंबईने सुरुवातीपासून दबदबा ठेवला. यजमानांच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात सौराष्‍ट्रा ला अवघ्या 148 धावांत गुंडाळले. नंतर पहिल्या डावात 355 धावा काढून मजबूत स्कोअर उभा केला. मुंबईचा पहिला डाव तिस-या दिवशी आटोपला. मुंबईने पहिल्या डावात तब्बल 207 धावांची मजबूत आघाडी घेतली. तिस-या दिवशी मुंबईने 6 बाद 287 धावांवरून पुढे खेळताना 355 धावांपर्यंत स्कोअर पोहोचवला.

82 धावांत सौराष्‍ट्रा चा खुर्दा
सौराष्‍ट्रा चा दुसरा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मुंबईच्या गोलंदाजांसमोर सौराष्‍ट्रा च्या फलंदाजांनी गुडघे टेकले. एक वेळ तर सौराष्‍ट्रा ची टीम 6 बाद 20 धावा अशी संघर्ष करीत होती. शौर्य सनंदिया (16) आणि धर्मेंद्रसिंग जडेजा (22) यांनी संघाचा स्कोअर 50 च्या पुढे नेला. अन्यथा सौराष्‍ट्रा ची टीम 50 च्या आत ढेपाळली असती. मात्र, त्यांना 82 धावांच्या पुढे जाता आले नाही. रणजीच्या फायनलमधील ही तिस-या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या ठरली. मुंबईकडून वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी (5/32) आणि कर्णधार अजित आगरकर (4/15) यांनी आपल्या टीमला तिस-या दिवशीच विजय मिळवून दिला. धवलने सामन्यात एकूण 9 गडी बाद केले.
सौराष्‍ट्रा ला मिळाले एक कोटी
या विजयासह मुंबईने दोन कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली. उपविजेत्या सौराष्‍ट्रा ला एक कोटी रुपये मिळाले. यजमान टीमसाठी हे 44 वे फायनल होते. यातील 40 मध्ये मुंबईने विजय मिळवला. सौराष्‍ट्रा ची टीम पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचली होती. त्यांना या लढतीत अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजा यांची उणीव प्रकर्षाने जाणवली.
*मुंबईने तीन वर्षांच्या कालावधीनंतर ही स्पर्धा जिंकली. यापूर्वी 2009-10 मध्ये त्यांनी विजेतेपद मिळवले होते. मागच्या दोन सत्रांत राजस्थानने किताब पटकावला होता.
*सचिन मुंबईसाठी लकी मस्कॉट ठरला. या वेळी सचिन क्वार्टर फायनलपासून मुंबई टीमसोबत जॉईन झाला. त्याच्या उपस्थितीने टीम मजबूत दिसू लागली. फायनलमध्ये तो 22 धावाच काढू शकला. रणजीमध्ये तो पहिल्यांदा धावबाद झाला. मात्र, त्याची उपस्थिती भाग्यशाली ठरली.
मुंबई दुस-या स्थानी
मुंबईने विक्रमी 40 व्यांदा रणजी स्पर्धा जिंकली. वर्ल्ड फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मुंबई दुस-या क्रमांकावर आहे. मुंबईपेक्षा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपदे फक्त ऑ स्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्सलाच जिंकता आली. न्यू साऊथ वेल्सच्या नावे 45 विजेतेपद आहेत. यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो.

मुंबईचा विक्रमी विजयी
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेला 1934-35 पासून सुरुवात झाली. पहिल्याच स्पर्धेत मुंबईने विजेतेपद मिळवले होते. तेव्हापासून आतापर्यंत 79 रणजी स्पर्धा झाल्या. यात मुंबईने 44 वेळा फायनलमध्ये प्रवेश मिळवताना 40 व्यांदा विजयश्री मिळवली. स्वातंत्र्यापूर्वी 13 वेळा ही स्पर्धा झाली, तर स्वातंत्र्यानंतर 66 वेळा रणजी स्पर्धा रंगली.