आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात मुंबईने सौराष्ट्राचा एक डाव व 125 धावांनी दारुण पराभव करीत रणजीचे 40 व्यांदा विजेतेपद पटकावले. मुंबईने सौराष्ट्राचा तिस-याच दिवशी धुव्वा उडवत विजय साकार केला. मुंबईचा सलामीवीर वसीम जाफरच्या शतकी (132) खेळीच्या बळावर मुंबईने पहिल्या डावात महत्त्वपूर्ण अशी 139 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे मुंबईने पहिल्या डावात 355 धावापर्यंत मजल मारली होती. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.
या सामन्यात मुंबईचा कर्णधार अजित आगरकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्याच दिवशी मुंबईच्या गोलंदाजांनी सौराष्ट्राला पहिल्या डावात 148 धावांत गुंडळाले होते. मुंबईकडून वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने 24 धावांत 4 गडी बाद केले. अभिषेक नायर आणि दाभोळकर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात मुंबईने दमदार सुरुवात करीत जाफर व कौस्तुभ पवारने 75 धावांची सलामी दिली. सचिन (22) व जाफरने तिसर्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. सचिन धावबाद झाला होता. मात्र जाफरच्या 132 च्या दमदार खेळीमुळे मुंबईने पहिल्या डावात 355 धावांपर्यंत मजल मारली होती.
आज तिस-या दिवशी सौराष्ट्राची दुस-या डावातही फलंदाजी कोसळली. सौराष्ट्राचा संपूर्ण संघ केवळ 82 धावांत बाद झाला. सनधिया (16) व जडेजा (22) यांनाच केवळ दुहेरी धावसंख्या करता आली. दुस-या डावात धवल कुलकर्णीने 5 तर कर्णधार अजित आगरकरने 4 गडी टिपले. नायरने एक बळी घेतला. पहिल्या डावातही धवलने 4 बळी टिपले होते. तर, दाभोळकर व नायर यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले होते.
धावफलक- सौराष्ट्र पहिला डाव- 148 आणि दुसरा डाव- 82 ( धवल कुलकर्णी - 32 धावांत 5 बळी, तर अजित आगरकर 14 धावांत 4 बळी. )
मुंबई- पहिला डाव- 355. (जाफर -132 धावा.)
पुढे क्लिक करा.....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.