आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुबई- भारताचा चेतेश्वर पुजारा आठवडाभरात आयसीसी कसोटी क्रमवारीतील टॉप टेन फलंदाजांच्या यादीतून बाहेर पडला. त्याची 12 व्या स्थानी घसरण झाली आहे. सलामीवीर मुरली विजयने क्रमवारीत करिअरमधील सर्वोत्कृष्ट स्थान गाठले. यात त्याने 16 स्थानांनी प्रगती केली. मोहाली कसोटीतील शतकानंतर त्याने क्रमवारीत 59 वरून 43 वे स्थान गाठले. आता मुरली विजयचे 500 रेटिंग गुण झाले आहेत. टीम इंडियाचा नवा सदस्य शिखर धवनने 61 व्या स्थानावरून आपल्या क्रमवारीला सुरुवात केली. तो मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत विजयाचा हीरो ठरला होता.
कोहली टॉप-20 मध्ये- मोहालीत नाबाद 67 आणि 34 धावा काढणारा युवा फलंदाज विराट कोहलीनेही क्रमवारीत सुधारणा केली. त्याने 20 वे स्थान गाठले आहे. त्याची ही करिअरमधील सर्वोत्कृष्ट क्रमवारी ठरली. तो यापूर्वी 24 व्या स्थानावर होता. त्याचे आता 648 रेटिंग गुण झाले आहेत.
पुजारा, सचिन, धोनीची घसरण- चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीची क्रमवारीत घसरण झाली. पुजाराने 10 वरून 12 वे स्थान गाठले. सचिनने 19 वरून 21 वे आणि धोनीने 21 वरून 24 वे स्थान मिळवले. गोलंदाजीत आर. अश्विन आठव्या, प्रग्यान ओझा नवव्या आणि इशांत शर्मा 34 व्या स्थानी कायम आहे.
आयसीसी टीम इंडियावर करणार बक्षिसांचा वर्षाव - टीम इंडियावर लवकरच बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील चौथी कसोटी जिंकल्यास आयसीसी भारतीय संघावर कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसाचा पाऊस पाडेल. आगामी एक एप्रिलपर्यंत क्रमवारीतील दुसरे स्थान गाठल्यास आयसीसी धोनी ब्रिगेडचा दोन कोटींचे बक्षीस देऊन गौरव करेल.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील वेलिंग्टन कसोटी ड्रॉ झाली. यामुळे कसोटी रँकिंगमध्ये दुसर्या स्थानासाठी स्पर्धा वाढली आहे. आता भारताला नवी दिल्लीत विजय मिळवणे आवश्यक आहे.
फलंदाजांची क्रमवारी
क्र. फलंदाज संघ गुण
1 हाशिम अमला द. आफ्रिका 903
2 एल्बी डिव्हिलर्स द.आफ्रिका 879
3 एस.चंद्रपॉल वेस्ट इंडीज 872
4 मायकेल क्लार्क ऑस्ट्रेलिया 869
5 कुमार संगकारा र्शीलंका 850
6 अँलेस्टर कुक इंग्लंड 817
7 जॅक कॅलिस द.आफ्रिका 756
8 रॉस टेलर न्यूझीलंड 750
9 युनूस खान पाकिस्तान 748
10 जोनाथन ट्रॉट इंग्लंड 733
गोलंदाजांची क्रमवारी
क्र. गोलंदाज संघ गुण
1 डेल स्टेन द. आफ्रिका 905
2 वेर्नोन फिलेंडर द. आफ्रिका 890
3 एस. अजमल पाकिस्तान 819
4 रंगना हेराथ र्शीलंका 783
5 पीटर सिडल ऑस्ट्रेलिया 782
6 जेस अँडरसन इंग्लंड 752
7 जी.स्वान इंग्लंड 740
8 आर.अश्विन भारत 720
9 प्रज्ञान ओझा भारत 715
10 मोर्न मोर्केल द.आफ्रिका 715
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.