आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • My Presence Understand, Table Tennis Player Sharath Kamal Critise On Organisation

माझ्या बांधिलकीची जाणीव व्हावी, टेबल टेनिसपटू शरथ कमलचे संघटनेवर ताशेरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचा आजपर्यंतचा सर्वोत्तम टेबल टेनिसपटू म्हणून ओळखल्या जाणा-या शरथ कमलने संघटनेवर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याएेवजी क्लबच्या माध्यमातून जर्मनीतील स्पर्धा खेळण्यास गेल्याने कमलची आशियाई संघात निवड करण्यात आली नसल्याच्या पार्श्वभूमीवर माझ्या देशाप्रति असलेल्या बांधिलकीची टीटीएफआयने जाणीव ठेवावी, असा टोलादेखील त्याने लगावला आहे.

जयपूरमध्ये १३ ते १५ मार्चदरम्यान होणा-या आशियाई स्पर्धेसाठीच्या संघातून शरद कमलला वगळण्यात आले आहे. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाचे नियम मी समजू शकतो. मात्र, गेल्या दशकभरातील कामगिरीचा संघटनेने जरा तरी विचार करायला हवा होता, असे मतदेखील कमलने व्यक्त केले. तो सध्या बुंदेसलिगाच्या बोरुसिया डुसेलडॉर्फ क्लबमधून जर्मनीत खेळत आहे. त्याने दोन वेळा कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.