आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • My War Still Continue Against Bcci Says I S Bindra

बीसीसीआयमधील गैरकारभाराविरूद्ध माझी लढाई सुरूच राहणार-आय.एस बिंद्रा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड- बीसीसीआयमध्ये सुरू असलेल्या गैरकारभाराविरुद्ध माझी लढाई सुरूच राहणार असल्याचे भारतीय क्रिकेट बोर्डचे माजी अध्यक्ष व पंजाब क्रिकेट संघाचे प्रमुख आय.एस.बिंद्रा यांनी स्पष्ट केले.

त्यांनी आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, ही लढाई खूप कठीण आहे. मात्र, मी हार मानणार नाही. चेन्नई येथे रविवारी झालेल्या बैठकीमध्ये जे काही झाले, त्यामुळे क्रिकेटप्रेमी निराश झाले आहेत. मी केवळ माझ्या भावना व्यक्त करत आहे. रविवारी बैठकीदरम्यान केवळ पैसा वाया गेला, या व्यतिरिक्त काही झाले नाही. दिल्लीत बसून संयुक्त सचिव आणि दोन राजकीय व्यक्ती बोलत होते. त्यांना चेन्नईला येण्याची आवश्यकता वाटली नाही.